siddharth bodke biography,wiki,photos,movies,serials

सिद्धार्थ बोडके (siddharth bodke)हा मराठी सिनेसृष्टीतील एक हरहुन्नरी कलाकार आहे. सध्याचं त्याचं ‘सॅड सखाराम’ हे प्रायोगिक रंगभूमीवरचं नाटक देखील प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरत आहे. अभिनेता आणि विशेषतः नाट्य कलाकार असलेल्या सिद्धार्थचा जन्म १७ सप्टेंबर १९९३ रोजी नाशिक येथे झाला. २०१५ साली त्याने आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. २०१५ मध्ये मराठी टीव्ही मालिकांमध्ये ‘गुम है किसी के प्यार में’ या मध्ये त्याने केलेली ‘जगताप’ हि भूमिका आणि ‘तू अशी जवळी रहा’ मधील राजवीर या भूमिका विशेष गाजल्या. प्रसिद्ध मराठी नाटक ‘अनन्या’ मधील त्याची ‘जय दीक्षित’ हि भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अनन्या या नाटकाने मराठी रंगभूमीवर ३00 हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. 

सिद्धार्थच्या अनन्या या नाटकातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून संस्कृती कलादर्पण पुरस्कार, महाराष्ट्र राज्यसभा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिद्धार्थच्या अभिनयाची सुरुवात बालवयापासूनच झाली. इयत्ता ५वी पासूनच त्याने अभिनय कार्यशाळेतून अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. ‘श्यामची आई’ या नाटकाच्या जवळपास ५५० प्रयोगामध्ये त्याने आपले अभिनय कौशल्य सादर केले आहे. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाला पैलू पडले. नाशिकमधील विविध प्रायोगिक नाट्यसंस्थांशी तो जोडला गेला. यामध्ये प्राजक्त देशमुख आणि श्रीपाद देशमुख यांचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. सध्याचं त्याचं ‘सॅड सखाराम’ हे प्रायोगिक रंगभूमीवरचं नाटक देखील प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरत आहे.   

सिद्धार्थने  टाइम बरा वाईट, भय आणि नेबर्स यांसारख्या चित्रपटातून विशेष छाप पाडली. दृश्यम २ सारखा हिंदी चित्रपट त्याच्या वाट्याला आल्यावर त्याने त्या संधीचे सोने केले. थिएटर आणि चित्रपट यासोबतच सिद्धार्थने ‘असे हे कन्यादान’ ‘नकुशी तरी हवीहवीशी’ ‘अस्स सासर सुरेख बाई!’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत, तसेच त्याने ‘बॅकपॅकर्स सीझन 2’ आणि ‘व्हायरल जोडी’ यासारख्या वेब सिरीज मध्ये अभिनयाची छाप पाडून डिजिटल माध्यमामध्ये देखील प्रवेश केला आहे.

नाशिक मध्ये एका स्थानिक वाहिनीसाठी व्हीजे (VJ- Video Jockey) आणि रेडिओ विश्वास 90.8 एफएम वर आरजे(RJ) म्हणून काम केलेल्या सिद्धार्थने आपल्या व्यावसायिक अभिनयासाठी मीडियाच्या या कामामधून फारकत घेतली. अभिनयाच्या विविध कामांमध्ये व्यग्र असताना सुद्धा सिद्धार्थने कायद्याची पदवी पूर्ण केली असून स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी त्याचे शिक्षण पूर्ण करण्याची त्याची निष्ठा कौतुकास्पद आहे. झोकून काम करण्याची वृत्ती आणि समरसून करत असलेला अभिनय या त्याच्या क्षमतेमुळे त्याला प्रेक्षकांकडून नेहमीच प्रशंसा मिळाली आहे. मनोरंजन क्षेत्रात सिद्धार्थ बोडके (siddharth bodke) हे नाव त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना पसंतीस उतरत असून खरोखरच उल्लेखनीय आहे. 

सिद्धार्थ बोडके(siddharth bodke) बायोग्राफी 

नावसिद्धार्थ बोडके
टोपण नावसिद्धार्थ, सिद्धू
मूळ गाव (home Town )नाशिक
सध्या वास्तव्यमुंबई
जन्म तारीख१७ डिसेंबर १९९३
उंची५. ८”
वय (२०२४ पर्यंत)३१
कुटुंबआई, वडील
शिक्षणB. A. LLB (law) लॉ
शाळाडे केअर हायस्कुल नाशिक
कॉलेजएन बी ठाकूर लॉ कॉलेज नाशिक
छंदअभिनय , व्यायाम, कविता करणे
वैवाहिक स्थितीविवाहित
पत्नीअभिनेत्री तितीक्षा तावडे
मुलंनाही
लग्नाची तारीख२६ फेब्रुवारी २०२४
राष्ट्रीयत्वभारतीय
सोशल मीडियावर आहे/ नाहीआहे
इंस्टाग्राम फॉलोअर्स६३. १ K
ई-मेल आय डीsiddharthbodkeofficial@gmail.com

 

चित्रपट (siddharth bodke movies) 

टाइम बरा वाईट (२०१५)

भय (२०१८)

दृष्यम २ (२०२२)

श्रीदेवी प्रसन्न (२०२४)

नाटक (siddharth bodke play) 

श्यामची आई

रेन मेकर एकांकिका

संध्या छाया

द क्लायंट ऑफ विच

मंत्रावळ

अनन्या

डायट लग्न

सॅड सखाराम

टीव्ही मालिका (siddharth bodke serial) 

असे हे कन्यादान

नकुशी तरीही हवीहवीशी

तू अशी जवळी रहा

असं सासर सुरेख बाई 

गुम है किसी के प्यार में

वेब सिरीज (siddharth bodke web series)

बॅक पॅकर्स सीजन २

गृहप्रवेश 

पती-पत्नी और लॉकेट  

वायरल जोडी

द एडवेंचर्स ऑफ LLEo  

म्युझिक व्हिडिओ (siddharth bodke music video)

चाहूल कुणाची..

credit: Titeekshaa Tawde youtube channel

siddharth bodke photo

siddharth bodke photo

 

 

अवॉर्ड्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता नाटक-अनन्या- संस्कृती कलादर्पण पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नाटक-अनन्या -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जी. बी. देवल पुरस्कार

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नाटक-अनन्या-मास्टर दिनानाथ मंगेशकर अवॉर्ड

सर्वोत्कृष्ट अभिनेता- महाराष्ट्र स्टेट गव्हर्नन्स अवॉर्ड 2018

सिद्धांतविषयी मनोरंजक माहिती –

सिद्धार्थने RVCJ मीडिया आणि Arre youtube चॅनेल साठी काम केलं आहे. नाशिक मध्ये एका स्थानिक वाहिनीसाठी व्हिडिओ जॉकी म्हणून काम केलं. नाशिक रेडिओ विश्वास 90.8 fm मध्ये आर जे म्हणून काम केलं. मराठी मालिका ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेमध्ये काम करत असताना मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडे हिच्याशी ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर पुढे लग्नात झाले.

sidddharth bodke wife 

Instagram Posts:

(credit-siddharth bodke instagram handle)

FAQ 

१. सिद्धार्थ बोडके (siddharth bodke) कोण आहे?

-सिद्धार्थ बोडके हा एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता आणि थिएटर कलाकार आहे. तो मुख्यतः टीव्ही मालिका आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करतो. ‘गुम हैं किसीके प्यार में’ या टीव्ही मालिकेतील जगताप माने या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. तसेच ‘तू अशी जवळी रहा’ या मराठी मालिकेतील राजवीर हे पात्र त्याने साकारले होते. अलीकडेच तो बॉलीवूड चित्रपट दृश्यम 2 मध्ये देखील दिसला होता आणि बॉलीवूडमधील आणखी चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका असणार आहेत. 

२. सिद्धार्थ बोडके विवाहित आहे का?

–  होय , सिद्धार्थ बोडके विवाहित आहे. २६ फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याने मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडे हिच्याशी विवाह केला आहे.

३. सिद्धार्थ बोडकेचे वय किती आहे?

सिद्धार्थ बोडकेचे वय ३० वर्षे आहे (२०२४ पर्यंत).

४. सिद्धार्थ बोडके यांचा वाढदिवस कधी असतो?

  १७ डिसेंबरला सिद्धार्थ बोडके यांचा वाढदिवस आहे.

५. सध्या सिद्धार्थ बोडकेचे कोणते काम चालू आहे?

–  सध्या सिद्धार्थ बोडके ‘सॅड सखाराम’ या प्रायोगिक नाटकात अभिनय करत आहेत. 

६. सिद्धार्थ बोडके किती उंच आहे?

–  सिद्धार्थ बोडके 5 फूट 8 इंच उंच आहे.

७. सिद्धार्थ बोडकेचे मूळ शहर कोणते आहे?

–  सिद्धार्थ बोडके हे मूळचे नाशिक, महाराष्ट्र इथले आहेत.

आपल्या लाडक्या कलाकारांबाबत आणखी वाचा: प्रिया बापट बायोग्राफी,विकि,करिअर

 

Leave a Comment