(nilesh sable new show) डॉक्टर निलेश साबळे यांचा एक नवीन कार्यक्रम सध्या कलर्स मराठी वाहिनीवर वर येत आहे. सगळीकडे या नवीन शोची खूपच चर्चा आहे.(nilesh sable new show) निलेश साबळे यांचा ‘हसतायना? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम लवकरच कलर्स मराठी वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता आहे.
(nilesh sable new show) ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!
खरंतर तब्बल दहा वर्ष झी मराठी वाहिनीवर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून निलेश साबळे यांनी लेखन, दिग्दर्शन या माध्यमातून मराठी प्रेक्षकांचं निखळ आणि खळखळून मनोरंजन केलं. त्यानंतर झी मराठीच्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर लगेचच डॉक्टर निलेश साबळे असाच एक सुंदर विनोदी कार्यक्रम घेऊन कलर्स मराठी (nilesh sable new show) वर आपल्या भेटीला येत आहेत. हि त्यांच्या चाहत्यांसाठी हे खूपच आनंदाची गोष्ट आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! असे या नवीन विनोदी कार्यक्रमाचे नाव आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डॉक्टर निलेश साबळे यांनी ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! हे नाव कसं ठरलं याची रंजक गोष्ट सांगितली आहे, तसेच या शोचा प्रोमो सुद्धा कलर्स मराठीवरून प्रसारित होत आहे. २७ एप्रिल पासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! हा निलेश साबळे यांचा नवीन कार्यक्रम कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे.
निलेश साबळे यांनी आपल्या नवीन कार्यक्रमाबाबत nilesh sable new show बोलताना एक छान गोष्ट सांगितली आहे,कलर्स मराठी चे हेड केदार शिंदे यांच्या बद्दल बोलताना निलेश साबळे यांनी एक नुकतीच गोष्ट शेअर केली आहे, ‘एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा वेळात वेळ काढून ते आपल्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! या कार्यक्रमाबद्दल उत्सुक आहेत, कार्यक्रमाचं काम कसं सुरू आहे जाणून घेण्यामध्ये केदार शिंदे देखील खूप उत्सुक आहेत, हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
चला हवा येऊ द्या हा प्रसिद्ध कार्यक्रम सतत दहा वर्षे न थांबता सुरु होता, या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन डॉक्टर निलेश साबळे करत होते. काही कारणांमुळे झी मराठी वरचा हा कार्यक्रम बंद होत असल्याची चर्चा होतीच. त्यामुळे पुढे काय? असा प्रश्न पडण्याआधीच निलेश साबळे यांच्या नवीन शो ची बातमी पुढे आली आहे. प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम हे देखील यामध्ये अभिनय करताना आपल्याला दिसणार आहेत, त्यांच्या सोबतच अभिनेता ओंकार भोजने, स्नेहल शिदम, सुवर्णा शाम असे अनेक नवीन कलाकार यामध्ये असणार आहेत. निलेश साबळे पुढे असं देखील म्हणाले कि नवीन कलाकार असले तरी या कलाकारांसोबत काम करताना देखील जबाबदारी वाढली आहे.
चला येऊ हवा येऊ द्या कार्यक्रमा ला जसं प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तसंच या हि कार्यक्रमाला मिळेल असं वाटतं. नवीन कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, या वाढत्या अपेक्षा या नव्या शोमध्ये पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. nilesh sable new show या शोला जास्तीत जास्त उंचीवर येण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे असं निलेश साबळे म्हणाले. चला हवा येऊ द्या मधील कलाकारांपैकी कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, अंकुर वाढवे हे कलाकार वगळता इतर कलाकार कलर्स वाहिनीच्या या नव्या शो मध्ये दिसणार आहेत. जुन्या कलाकारांबद्दल बोलताना निलेश साबळे म्हणाले कि, ते आमच्यासाठी खूप जवळचे होते, आहेत, पुढे राहतील. बाकी सगळे कलाकार जरी इकडे आहेत पण मला असं वाटतं की ज्या लोकांसोबत एकत्र काम करत करत आपण पुढे आलो तो आम्हा सगळ्यांचा एकत्र प्रवास होता आणि सगळेच अतिशय प्रामाणिक, मेहनती आणि खूप उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी आधीच्या शोसाठी प्रचंड मेहनत केलेली आहे म्हणूनच चला हवा येऊ द्या यशाच्या उच्च शिखरावर पोहोचू शकले. दहा वर्षाच्या मेहनतीनंतर सर्वच कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या सर्व सहकलाकारांशिवाय हा प्रवास पुढे होऊच शकला नसता असे निलेश साबळे यांनी नमूद केले. सगळ्यांची मेहनत दिसली ती पुढेही दिसत राहील. सगळेच सध्या आपापल्या प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन पुढचा प्रवास करायला नक्की आवडेल असेही निलेश साबळे म्हणाले, एखादा सिनेमा असतो त्या सिनेमात जी पात्र असतील तीच पात्र कदाचित पुढच्या कलाकृती मध्ये असतीलच असे नाही, त्यामुळे पुढे जाऊन अशी संधी उपलब्ध झाली तर आधीच्या सर्व कलाकारांचे स्वागतच असेल. त्यामुळे निश्चितपणे ते आमच्यासाठी खूप जवळचे होते, आहेत आणि राहतील. इतर नवीन कलाकार देखील यामध्ये आहेत. या कलाकारांची भन्नाट कॉमेडी कशी असेल यासाठी आता सगळेच उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या कलाकारांनी हजेरी लावली आहे.
२७ एप्रिल पासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! हा निलेश साबळे यांचा नवीन कार्यक्रम (nilesh sable new show) कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. सध्या या शो चे प्रोमोज कलर्स मराठी वाहिनीवर दिसत आहेत, हे प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पहिल्या भागाचा प्रोमो प्रसारित झाला असून त्यामध्ये ‘बाई पण भारी देवा’ या चित्रपटाचे कलाकार दिसत आहेत. भाऊ कदम आणि ओंकार भोजने हे बाई पण भारी च्या वंदना गुप्ते आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहेत. प्रोमो पाहिल्यानंतर आणि भाऊ कदम आणि ओंकार भोजने याना स्त्री पात्रांमध्ये पाहिल्यावर प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. निलेश साबळे (nilesh sable new show) दिग्दर्शित कलर्स मराठीचा हा नवीन शो, ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! प्रेक्षकांचे किती मनोरंजन करणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.