प्रसिद्ध पंजाबी संगीतकार (amar singh chamkila) अमर सिंग चमकीला यांच्यावर आधारित नुकताच एक हिंदी चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे पण हे पात्र चित्रपट माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्यामागे दिग्दर्शक इम्तियाज अली आपलं मत व्यक्त केले आहे.
(amar singh chamkila) प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा चित्रपट अमर सिंग चमकीला
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा अमर सिंग चमकीला (amar singh chamkila) हा चित्रपट सध्या चर्चेमध्ये आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरपूर दाद मिळत आहे तसेच या चित्रपटाद्वारे बऱ्याच कालावधीनंतर दिग्दर्शक इम्तियाज अली यांचे पुन्हा आगमन देखील झाले आहे. हा चित्रपट बनवण्याबद्दलची किंबहुना बनवण्या मागची एक गोष्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी नुकतीच एक मुलाखती यामध्ये सांगितली आहे..
प्रसिद्ध पंजाबी संगीतकार अमरसिंग चमकीला यांच्यावर आधारित हिंदी चित्रपट येत आहे अमरसिंग चमकीला यांच्या मुख्य भूमिकेत पंजाबी गायक असून त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका आहे, तसेच दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी मुलाखतीमध्ये नुकतेच सांगितले आहे की जेव्हा एखाद्या कलाकाराचं किंवा प्रसिद्ध व्यक्तीची आत्मकथा किंवा आत्मचरित्र जेव्हा तुम्ही मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस अगदी लहानात लहान गोष्टी कडे सुद्धा खूप बारकाईने लक्ष देणे हा एक आवश्यक भाग होऊन जातो. चित्रपट निर्मितीमध्ये आणि त्यातही एका प्रसिद्ध व्यक्तीचं आयुष्य जेव्हा तुम्ही मोठ्या पडद्यावर साकारता किंवा मोठ्या पडद्यावर साकारण्याची हिंमत करता तेव्हा त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे एका तटस्थ नजरेने पाहणे सुद्धा आवश्यक आणि गरजेचे बनते.
मला त्यांच्या आयुष्यातील अगदी प्रत्येक गोष्ट खरं तर बारकाईने दाखवायची होती. कधी कधी व्यक्तीच्या चांगल्या बाजू सोबतच त्रुटी देखील प्रेक्षकांना भावून जातात,दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी म्हटले आहे. अमरसिंग चमकीला या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी पुढे असे देखील म्हटले आहे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं आयुष्य पडद्यावर उभे करता, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या आयुष्यातील खऱ्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही पण त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व पैलूंचे दर्शन घडवणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
प्रसिद्ध पंजाबी संगीतकार अमरसिंग चमकीला यांच्यावर आधारित हिंदी चित्रपटाचे कथानक हे 1970 च्या दशकातील दाखवले आहे. १९७० च्या दशकातील पंजाबमधील एक अत्यंत खालच्या वर्गातील लोकगीते गाणारा एक तरुण म्हणजेच अमर सिंग चमकीला. अमर सिंगचे खरे नाव धनीराम, जन्म एका गरीब घरातला. लहानपणापासूनच त्याला वेगवेगळी कामे करून कुटुंबाला हातभार लावावा लागत असतो. असा खडतर परिस्थितीतेही अमरसिंगला गायनाची आवड स्वस्थ बसू देत नसते. त्याला गायनाची आवड असते. गाणी देखील तो स्वतःच लिहित असतो आणि त्यांना संगीतही देत असतो. त्या काळात अनेक नावाजलेल्या आणि प्रसिद्ध गायकांसोबत अमर सिंग चमकीला यांचे नाव स्पर्धक म्हणून घेऊ लागले जाते. त्यांच्या गाण्यांच्या कॅसेट्सची विक्री कोट्यवधी रुपयांना होऊ लागते. पण काहीशी थोडी अश्लील अशी गाणी तो सादर करीत असतो आणि त्याची ही गाणी देखील लोकांनी डोक्यावर उचलून घेतलेली असतात.
आपल्याकडे ज्याप्रमाणे तमाशाची गाणी थोड्याफार प्रमाणात अश्लीलते कडे जाणारी असतात तसाच प्रकार अमरसिंग चमकीला यांच्या गाण्यांचा असतो किंवा भोजपुरीमध्ये अश्लील गाणी असतात अगदी काहीसे त्यातलाच हा प्रकार. पण तरी देखील या गायकाची परदेशातही प्रचंड लोकप्रियता वाढते. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याला पंजाबचा एल्विस प्रेस्ली म्हणून ओळखले जाऊ लागते.त्याची पत्नी देखील त्याच्यासोबत गाऊ लागते. पत्नीबरोबर त्याची जोडी दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ होतात.
अशातच अचानक एक दिवस हे गायक पतिपत्नी एका कार्यक्रमासाठी जात असताना या पती पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, त्यावेळी अमर सिंग चमकीला हा फक्त 27 वर्षांचा असतो. पोलीस हत्येचा तपास सुरु करतात आणि काही काळा नंतर तपास बंद करून टाकतात. चित्रपट सुरुच होतो अमर सिंह चमकीला आणि त्याची पत्नी अमरजोत यांच्यावर झालेल्या गोळीबाराने. गोळीबारात गायक पती पत्नीचा मृत्यू होतो. फिल्लौरला या दोघांचे मृतदेह घेऊन जात असतात. त्यावेळेस तिथे पोलीसही येतात. इथून चित्रपटाची कथा सुरु होते. चमकीलाची कथा पोलीस अधिकाऱ्याला सांगत असतानाच आपल्यासमोरही चमकीलाचे आयुष्य उलगडत जाते. गोळीबारात दोघांचा मृत्यू होतोअमर सिंग चमकीला या गायकाची हत्या कोणी आणि का केली हे अजूनही कोडं आहे. एखाद्या थरारक आणि रहस्यमय हॉलीवूड चित्रपट वाटावा असा हा आकर्षक असा विषय आहे.
आणखी वाचा : निलेश साबळे यांचा नवीन कार्यक्रम nilesh sable new show
amar singh chamkila रंजक बायोग्राफी
एखाद्या व्यक्तीची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर सिनेमाच्या रूपात प्रेक्षकांसमोर सादर करताना फार काळजीपूर्वक साकारावी लागते असे दिग्दर्शक इम्तियाज अली म्हणतात. तसेच त्यात रंजकतेसाठी थोड्याफार प्रमाणात नाट्यरंग भरावे लागतात तरच ती प्रेक्षकांना सिनेमा गृहाकडे खेचून आणू शकते. आजपर्यंत अनेक बायोग्राफी रुपेरी पडद्यावर आल्या. त्यापैकी बऱ्याचशा यशस्वी देखील झाल्या. आता इम्तियाज अली यांनी अमर सिंग चमकीला च्या रूपाने नव्याने प्रयत्न केला असून एक अत्यंत उत्कृष्ट असा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केला आहे ते म्हणजेच अमर सिंग चमकीला.
चित्रपट सुरु होतानाच हा खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट आहे असे दिग्दर्शकाने नमूद केले आहे. या चित्रपटातील घटना, व्यक्ती, प्रसंग काल्पनिक असून त्यात साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा असे अस्वीकरण अधोरेखित होते. इम्तियाज अली यांना हे अधोरेखित करण्याची गरज का वाटावी हे जेव्हा आपण चित्रपट पाहायला सुरुवात करतो तेव्हा याची जाणीव होते. इम्तियाज अलीने चमकीला यांच्या जीवनाचा अभ्यास करून कुठे स्वरूपात रचना केली आहे. त्यावेळचा काळ, १९७० च्या दशकातील पंजाब मधील संगीत वलय या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला गेला असेल हे दिसून येते आणि मगच हि कथा पडद्यावर उत्कृष्टरित्या साकार झाली आहे.
1 thought on “amar singh chamkila-अमर सिंग चमकीला”