(priya bapat) प्रिया बापट बायोग्राफी, विकि, वय, कुटुंब, करिअर आणि बरंच काही..
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया बापट(priya bapat)हिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांवर वेगळाच ठसा उमटवला आहे. टीव्ही मालिका, मराठी नाटक, मराठी चित्रपट, हिंदी मालिका, हिंदी चित्रपट, हिंदी वेब सिरीज अशा विविध माध्यमातून अतिशय उत्तम अभिनय साकारत प्रिया बापट(priya bapat) नेहमीच प्रेक्षकांसमोर येत आहे.
जाणून घेऊयात प्रिया बापट(priya bapat)विषयी बरंच काही..
कौटुंबिक माहिती
प्रिया बापट हि मूळची दादर, मुंबईची असून तिच्या घरी तिचे आई, बाबा आणि एक मोठी बहीण आहे. बालमोहन शाळेची हि विद्यार्थिनी विद्या ताई पटवर्धन यांच्या मार्गदर्शनखाली अभिनयाचे धडे गिरवू लागली. प्रिया बापट ‘दे धमाल’ या मराठी मालिकेतून बालकलाकार म्हणून तिने पदार्पण केले. २०११ मध्ये प्रिया बापट हि मराठी अभिनेता उमेश कामत याच्याशी विवाहबद्ध झाली. उमेश आणि प्रिया हे मराठी मालिका किमयागार मध्ये एकत्र अभिनय करत होते. इथूनच त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली असे प्रिया ने मुलाखतींमधून सांगितले आहे.
नाव | प्रिया बापट |
जन्म ठिकाण | दादर,मुंबई |
जन्म तारीख | १८ सप्टेंबर १९८६ |
वय | ३८ |
कुटुंब | आई, वडील,मोठी बहीण |
पती | उमेश कामत |
मुले | नाही |
शाळा | बालमोहन विद्यालय दादर |
महाविद्यालय | रामनारायण रुईया महाविद्यालय सोफिया पॉलिटेक्निक महाविद्यालय |
शिक्षण | मास कम्युनिकेशन पदवी |
मूळ शहर | दादर, मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
चित्रपट
- पदार्पण -डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२०००) यामध्ये तरुण रमा बाईंची भूमिका (बाल कलाकार)
- चित्रपट — मी शिवाजीराजे भोसले बोलतोय -२००९ (भूमिका- शशिकला भोसले) मराठी पदार्पण
- काकस्पर्श -२०१३ (भूमिका- उमा ) मराठी
- टाइम प्लिज
- मुन्नाभाई MBBS २००३- (भूमिका- वैद्यकीय विद्यार्थी)
- आनंदी आनंद 2018
- काकस्पर्श 2018
- टाईम प्लीज 2018
- आंधळी कोशिंबीर 2014
- लोकमान्य एक युगपुरुष 2017
- टाईमपास टू 2017
- वजनदार 2017
- हॅपी जर्नी
मराठी मालिका-
- दे धमाल (अल्फा मराठी) २००१ भूमिका -ऋतुजा (बाल कलाकार)
- आभाळमाया
- शुभं करोति (भूमिका- किमया )
- दामिनी 2018
- बंदिनी 2018
- अधुरी एक कहाणी 2013
- शुभम करोति
वेब सिरीज –
- हिंदी -माया नगरी – सिटी ऑफ ड्रीम्स, २०१९- (भूमिका- पौर्णिमा गायकवाड)
- मराठी- आणि काय हवं
नाटक –
- मराठी नाटक- नवा गडी नवं राज्य
निर्मिती
प्रिया बापट (priya bapat) उत्तम अभिनेत्री तर आहेच, परंतु अभिनयासोबतच तिने निर्मिती क्षेत्रातही आपले पाऊल ठेवले आहे. अभिनयासोबतच नाटक निर्मितीमध्ये देखील ती उतरली आहे.
निर्मिती-मराठी नाटक
- दादा एक गुड न्यूज आहे
वेब सिरीज च्या माध्यमातून देखील प्रिया बापटने (priya bapat) आपले अभिनव कौशल्य प्रेक्षकांसमोर आणले आहे तिची मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स ही हिंदी वेब सिरीज प्रचंड गाजलेली आहे तसेच मराठीतील आणि काय हवं ही देखील वेब सिरीज देखील खूप प्रेक्षकांना भावून गेली हिंदी वेब सिरीज सिटी ऑफ ड्रीम्स या सिरीज मधले तिची बोल्ड सीन प्रचंड गाजले पण प्रिया आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.
आवड
उत्तम अभिनयासोबतच प्रिया बापटने(priya bapat) आपल्या गाण्याची आवड ही जोपासली आहे. गायिका उत्तरा केळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. झी मराठीवरील सारेगमप मराठी या मराठी गाण्यांच्या रियालिटी शोमध्ये तिने भाग घेतला होता तसेच एका सिझनचं सूत्रसंचालन केलं होतं.
(priya bapat) पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 2013 मराठी चित्रपट काकस्पर्श स्क्रीन अवॉर्ड्स
- महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2014 हॅपी जर्नी चित्रपट
- महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2021 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मराठी वेब सिरीज-आणि काय हवं
अलीकडच्या काळात ओटीपी प्लॅटफॉर्म मुळे अनेक कलाकारांना वेब सिरीज हे माध्यम खुले झाले आहे. प्रिया बापट ही देखील यामध्ये मागे नाहीये, हिंदी तसेच मराठी कलाकारांनी सुद्धा डिजिटल माध्यम म्हणजे ओटीपी प्लॅटफॉर्मच्या वेब सिरीज या माध्यमातून आपले अभिनय कौशल्य रसिक प्रेक्षकांपुढे सादर करत आहेत. प्प्रिया बापटणे देखील हिंदी वेबसिरीज ‘मायानगरी-सिटी ऑफ ड्रीम्स’ यामध्ये मुख्य भूमिका साकारली. यातील प्रमुख भूमिका पौर्णिमा गायकवाड अतिशय सजग आणि जबरदस्त अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना धक्का दिलाय. तिची हि भूमिका अत्यंत गाजली आहे. खरं म्हणजे ही भूमिका गाजली एका वेगळ्याच कारणासाठी. अतिशय उत्तम आणि मराठीतले नावाजलेले कलाकार या वेबी सिरीज मध्ये आहेत. असे असूनही प्रियाच्या नावाची मात्र बरी चर्चा झाली. कारण या वेब सिरीज मध्ये प्रिया बापटने एक बोल्ड सीन केला आहे, या सीनची सोशल मीडियावर चांगली चर्चा झाली पण प्रिया बापट आपल्या भूमिकेवर ठाम राहीली. मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स मधली तिची पौर्णिमा गायकवाड ही भूमिका तिने अतिशय उत्तम रित्या सादर केली. या वेब सिरीजमुळे प्रिया बापट हे नाव सर्वमुखी झाले. मराठी मध्ये तिची वेबसिरीज सुद्धा गाजली ती म्हणजे “आणि काय हवं..” हीच वेब सिरीज तिने तिचा पती उमेश कामत या सोबतच केली आहे. दोघांच्या मुख्य भूमिका आहेत. हि देखील प्रेक्षकांना देखील खूप भावली आहे.
आणखी वाचा – अमरसिंग चमकीला मूवी रिव्ह्यू
कलाकार हा नेहमी चांगल्या भूमिकेचा भुकेला असतो. प्रिया बापट सुद्धा यात मागे नाही. प्रिया ने वजनदार या एका मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी स्वतःचे वजन देखील वाढवले होते. यासाठी तिने विशेष आहार आणि व्यायामाचे मार्गदर्शन घेतले होते. प्रिया बापट हि नेहमीच वेगवेगळ्या प्रयोगशील भूमिकांसाठी आग्रही राहिली आहे आणि आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकत आली आहे.